IND vs NZ 1st ODI Live : शुभमन गिलचा आत्मघातकी निर्णय? ५ फलंदाज, ४ जलदगती गोलंदाज अन् २ ऑलराऊंडरसह टीम मैदानात

India vs New Zealand 1st ODI Marathi Cricket News : न्यूझीलंडमध्ये भारताची कामगिरीही फारशी प्रभावी नाही, जिथे त्यांनी शेवटचा वन डे सामना फेब्रुवारी २०१९ मध्ये जिंकला होता.
New Zealand vs India 1st ODI Marathi Live Score

New Zealand vs India 1st ODI Marathi Live Score

esakal

Updated on: 

New Zealand vs India 1st ODI Marathi Live Score : ट्वेंटी-२० मालिकेत धावांचा पाऊस पाहायला मिळाल्यानंतर आता उत्सुकता आहे, ती वन डे मालिकेची. या मालिकेतून टीम इंडियात मोठ मोठे धुरंदर मैदानावर उतरलेले दिसणार आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा यांचा खेळ पाहण्याची साऱ्यांनाच आतुरता आहे, कारण या दोन महान खेळाडूंचा हा शेवटचा न्यूझीलंड दौरा आहे. न्यूझीलंडच्या इडन पार्कवर पहिला वन डे सामना आज होतोय आणि येथे २००७ मध्ये ३४० ही सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली होती. पण, ऑकलंड येथील मागील दोन वन डे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ अनुक्रमे १५० व ७६ धावांवर गुंडाळला गेला होता. त्यामुळे येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अवघड आहे.

Loading content, please wait...