Virat Kohli takes a sensational catch to dismiss Nathan Smith during the India vs New Zealand 1st ODI.
esakal
New Zealand vs India 1st ODI Marathi Live Score : भारतीय गोलंदाजांनी यजमान न्यूझीलंडला पहिल्या वन डे सामन्यात जेरीस आणले. अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच दोन धक्के दिल्यानंतर गुरनूर ब्रारने दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. ३९ वर्षीय रोहित शर्माने क्षेत्ररक्षणात दाखवलेली चपळता वाख्याण्यजोग होती आणि त्याने एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. अंशुल कंबोजच्या माऱ्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. त्यात विराट कोहलीने ( VIRAT KOHLI CATCH ) टिपलेला अविश्वसनीय झेलने किवी समर्थकांची बोलती बंद केली.