India vs New Zealand 1st Test Day 2 match report
esakal
India vs New Zealand 1st Test Day 2 Marathi Cricket News : यजमान न्यूझीलंडने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड मिळवली. हेन्री निकोल्स व ग्लेन फिलिप्स यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर किवींनी ५ बाद ७० धावसंख्येवरून जबरदस्त पुनरागमन केले. पण, दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आकाश दीपने दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडसाठी सहाव्या विकेटसाठीची २१६ धावांची भागीदारी तोडली आणि त्यानंतर यजमानांचा डाव गडगडला. निकोल्स दीडशतकी खेळी करून नाबाद राहिला.