IND vs NZ 1st Test Day 2 Live: ३२ वर्षांची प्रतीक्षा संपली! यशस्वी जैस्वाल-लोकेश राहुल यांनी सॉलिड सुरूवात करून दिली; दुसऱ्या दिवसाच्या खेळात नेमकं काय घडलं?

New Zealand vs India, 1st Test Day 2 Marathi Cricket News : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी सलामीला शतकी भागीदारी करत ३२ वर्षांची प्रतीक्षा संपवली. या जोडीने भारताला भक्कम सुरुवात करून दिली.
Yashasvi Jaiswal and KL Rahul create history against New Zealand

Yashasvi Jaiswal and KL Rahul create history against New Zealand

Updated on: 

India vs New Zealand 1st Test Day 2 Marathi Cricket News : यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल यांनी पुन्हा एकदा ते SENA देशांमध्ये मैदान गाजवणारे फलंदाज आहे, हे सिद्ध केले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३६८ धावांचा पाठलाग करताना Yashasvi Jaiswal चे शतक थोडक्यात हुकले असले तरी, KL Rahul सह त्याने विक्रमी भागीदारी करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. १९९४ नंतर न्यूझीलंडमध्ये कसोटीत भारतीय सलामीवीरांनी केलेली ही पहिली शतकी भागीदारी ठरली. तेव्हा नयन मोंगिया व नवज्योत सिंग सिंद्धू यांनी सलामीला शतकी धावा जोडल्या होत्या. भारतीय संघाने IND vs NZ 1st Test च्या दुसऱ्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे.

Loading content, please wait...