IND vs NZ 1st Test Day 2 Live: यशस्वी जैस्वालने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम; केएल राहुलसह शतकी भागीदारी अन् रेकॉर्ड बुकमध्ये उलथापालथ

Yashasvi Jaiswal breaks Virat Kohli WTC record: भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विक्रम नोंदवला. डावाची सुरुवात करताना त्याने आक्रमक फलंदाजी केली आणि अवघ्या ६६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.
Yashasvi Jaiswal breaks Virat Kohli WTC record

Yashasvi Jaiswal surpasses Virat Kohli in World Test Championship runs

esakal

Updated on: 

India vs New Zealand 1st Test Day 2 Marathi Cricket News : भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांनी मिळालेल्या जीवदानांचा फायदा उचलून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना हैराण केले. किवींच्या ३६८ धावांचा पाठलाग करताना यशस्वी-लोकेश जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यशस्वीने ६६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना मोठा विक्रम नावावर केला. या खेळीदरम्यान त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला.

Loading content, please wait...