
Pakistan’s T20I performance : पाकिस्तान संघाला रविवारी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आणखी एका लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तानच्या संघात बदलाचे वारे वाहू लागले आणि नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन हा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. पण, पहिल्याच सामन्यांत त्यांचे वस्त्रबरण झाले. न्यूझीलंडने ९० धावावंर पाकिस्तानला गुंडाळले आणि ६१ चेंडूंत मॅच जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.