

Pakistan’s Usman Khan ruled out of second ODI against New Zealand : ट्वेंटी-२० मालिकेलीत लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला न्यूझीलंड दौऱ्यावर वन डे मालिकेतही निराशाजनक सुरुवातीचा सामना करावा लागला. यजमान न्यूझीलंडने पहिल्या वन डे सामन्यात ७३ धावांनी विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली आहे. उभय संघांमध्ये दुसरा वन डे सामना बुधवारी पहाटेपासून खेळवला जाणार आहे आणि त्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का बसला आहे. नेपियर सामन्यातून पाकिस्तानच्या संघात पदार्पण करणारा उस्मान खान दुसऱ्या सामन्यातून माघार घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.