
Nawab of Pataudi: भारताचे सर्वात युवा कर्णधार म्हणून ओळखले जाणारे मन्सूर अली खान पतौडी उर्फ टायगर पतौडी, यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठं यश मिळवलं. ५ जानेवारी १९४१ रोजी जन्मलेल्या टायगर पतौडी यांनी सत्तरचे दशक गाजवले होते.
पण त्यांनीआंतरराष्ट्रीय क्रिकेट एका डोळ्याने अंधूक दिसत असताना खेळले हे विशेष. त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणापूर्वीच उजव्या डोळ्याची दृष्टी गमावली होती. याबाबत त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सांगितले होते.