Ouch! Johnathan Thurston Suffers Painful Hit-Wicket Dismissal, Usman Khawaja And Umpires Burst Into Laughter Video
esakal
Johnathan Thurston bizarre hit wicket dismissal video: क्रिकेटच्या मैदानावर कधी काय घडेल, याचा नेम नाही! ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० गोल्ड क्लॅश सामन्यात असाच एक भन्नाट प्रसंग पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा माजी रग्बी लीग स्टार जॉनथन थर्स्टन केर्न्स येथे झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यात विचित्र पद्धतीने बाद झाला. जॉनथनची विकेट पाहून अम्पायरसह साऱ्यांनाच हसू आले आणि क्रिकेटच्या मैदानावर एक मजेशीर प्रसंग अनुभवायला मिळाला.