‘द हंड्रेड’ स्पर्धेत ओव्हल इन्क्विन्सिबल्सने अवघ्या २८ चेंडूत १०३ धावा फटकावत अप्रतिम विजय मिळवला.
ट्रेंट रॉकेट्सविरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या टप्प्यात संघाने आक्रमक फलंदाजी करत सामना हिसकावून घेतला.
जॉर्डन कॉक्सने तुफानी खेळी करत चौकार-षटकारांचा वर्षाव केला, सॅम करननेही सोबत दिली
Oval Invincibles scripted a historic win in The Hundred : दी हंड्रेड लीगमधील ओव्हल इन्क्विन्सिबल्स संघाने अविश्वसनीय विजय मिळवताना ट्रेंट रॉकेट्स संघाला अचंबित केले. १०० चेंडूंत १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओव्हलने ६० चेंडूंत ७० धावाच केल्या होत्या आणि त्यांना ४० चेंडूंत १०२ धावा करायच्या होत्या. जॉर्डन कॉक्स व सॅम कुरन ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि २८ चेंडूंत १०३ धावा करून मॅच जिंकून दिली. ६ विकेट्स व ११ चेंडू राखून ओव्हलने हा सामना जिंकला.