Mohammad Kaif questioned Kuldeep Yadav's future in international cricket
esakal
Why was Kuldeep Yadav dropped from 3rd ODI against England? भारतीय संघात प्रमुख गोलंदाज नसतानाही अनुभवी कुलदीप यादवला इंग्लंड दौऱ्यावर एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. कुलदीपला तिसऱ्या वन डे सामन्यात संधी न मिळल्यामुळे आता त्याने निवृत्तीचा विचार करायला हवा, असा सल्ला भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने ( Mohammad Kaif) त्याला दिला आहे. कुलदीप मागील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शेवटची वन डे मॅच खेळला होता. त्याला इंग्लंड मालिकेत संधी मिळायला हवी होती, परंतु तिन्ही सामन्यात तो बाकावर बसून राहिला.