Confusion on the pitch as Bangladesh batters end up at the same end during the Pakistan vs Bangladesh 1st ODI.
esakal
PAK vs BAN 1st ODI Turns Comedy: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं अपयश विसरून आता आम्ही २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी जोर लावणार आहे, पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीची डरकाळी बांगलादेशने फुस्सsssss केली.. बांगलादेशने पहिल्याच वन डे सामन्यात पाकिस्तानवर ८ विकेट्स व २०९ चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान बांगलादेशला वगळले म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) जी नाटकं केली, ते सर्वांना माहित आहेतच... बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यासाठी पीसीबीचे आभारही मानले आणि आता दोघंही वन डे मालिकेत एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. पहिल्या सामन्यातील एक असा प्रसंग सध्या चर्चेत आहे आणि यामुळे दोन्ही संघांची थट्टा केली जात आहे.