Asif Afridi created history in Karachi by becoming the oldest bowler to claim a five-wicket haul on Test debut
esakal
Pakistan vs South Africa 2nd Test Karachi highlights : पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटीत रंगतदार अवस्थेत आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ३३३ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ८ बाद २८५ धावा केल्या आहेत. २३५ धावांवर आठवी विकेट गमावल्यानंतर भारतीय वंशाचा सेनुरन मुथूसामी मैदानावर उभा राहिला आहे आणि त्याच्या नाबाद ४८ धावांनी पाकिस्तानला घाम गाळायला लावले आहे. दरम्यान, या कसोटीत ३८ वर्ष व ३०१ दिवसांच्या आसिफ आफ्रिदीने ( Asif Afridi ) पदार्पण केले आणि पाच विकेट्स घेऊन त्याने ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.