Pakistan batter Hasan Nawaz is facing backlash after his controversial
esakal
Pakistan batter Hasan Nawaz interview controversy: भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना हा तणावपूर्ण असतोच... मैदानावर, मैदानाबाहेर तो तणाव जाणवतो... त्यात पाकिस्तानचा २३ वर्षीय फलंदाज हसन नवाझ याने वादग्रस्त विधान केले आहे. त्याने एका स्थानिक टीव्ही मुलाखतीत केलेले वक्तव्य असभ्य होते, यावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील क्रिकेट चाहते सहमत आहेत. पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना त्याने २९१ धावा केल् आहेत. पत्रकार कादिर ख्वाजा यांनी फलंदाजी करताना कोणत्या गोलंदाजांचा सामना करायला आवडेल, असा प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तराची एक क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली, ज्यामुळे अनेक प्रेक्षकांकडून टीका झाली.