

Pakistan Vs South Africa 3rd ODI : पाकिस्तान क्रिकेट संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेची मालिका ३-० अशी जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी पाकिस्तानसाठी हा खूप मोठा विजय आहे आणि दक्षिण आफ्रिकेत द्विदेशीय मालिका ३-० अशा फरकाने जिंकणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेल त्यांच्याच घरच्या मैदानावर वन डे मालिकेत कोणत्याही संघाने व्हाईट वॉश दिलेला नव्हता.