
PCB update on Haris Rauf Injury: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. आधीच पाकिस्तानातील स्टेडियमचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने यजमान टीका सहन करत आहेत. त्यात २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ज्या खेळाडूच्या जोरावर ते चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्याच्यामुळेच त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे.