Pakistan Cricket : पाकिस्तानचे दोन सीनियर खेळाडू निघाले 'गद्दार'? सायबर क्राईमने पाठवले समन्स, लॉर्ड्स कसोटीत Fixing ची शंका

Mohammad Rizwan Imam-ul-Haq NCCIA summons: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ क्रिकेटपटूंची सायबर क्राईम एजन्सीकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ENG vs PAK Test

Babar Azam

esakal

Updated on

Pakistan cricketers summoned by cyber crime agency: पाकिस्तान क्रिकेटमध्ये रोज नवीन ड्रामा पाहायला मिळतोय. इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या दोन कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर, रोज पाकिस्तान क्रिकेटचे नवीन किस्से ऐकायला मिळत आहेत. दुसऱ्या कसोटीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सात खेळाडू व मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना घरी पाठवले. आता एवढे बदल करूनही तिसऱ्या कसोटीत संघ मार खातोय आणि त्यात नवीन वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानच्या संघातील दोन सीनियर खेळाडूंना राष्ट्रीय सायबर क्राईम तपास यंत्रणेने ( NCCIA) समन्स पाठवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com