

Pakistan Cricket Team
esakal
Pakistan Cricket Team: इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर आता संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान आणि सलामीवीर इमाम उल हक यांना दौरा संपण्यापूर्वीच मायदेशी पाठवलं जाऊ शकतं, अशी माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानला लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने डाव आणि १०३ धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला १९४ धावांनी पराभव पत्करावा लागला. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तानची विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेतील स्थितीही खूप खराब झाली आहे.