Shoaib Akhtar Slams Pakistan Team, Says India Has Stronger Players
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच मोठी उत्सुकता निर्माण करणारा असतो. मात्र, या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या संघावर बोचरी टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू भारतीय संघाचे कौतुक करत असताना शोएबने मात्र मोहम्मद रिझवानच्या संघाचे कान टोचले आहेत.