पाकिस्तानच्या संघात 'सर्कस' सुरूच... ज्याची हकालपट्टी केली, त्यालाच पुन्हा बोलावले; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

Pakistan ODI squad for Australia series 2026: पाकिस्तान क्रिकेटमधील निवड समितीचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी संघातून बाहेर करण्यात आलेल्या बाबर आझमला आता पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
Babar Azam has returned to Pakistan’s ODI squad for the Australia series

Babar Azam has returned to Pakistan’s ODI squad for the Australia series

Updated on

Babar Azam recalled for Australia ODI series: पाकिस्तान क्रिकेट संघात पुन्हा एकदा सर्कस पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी पाकिस्तानने १६ सदस्यीय संघ जाहीर केला. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील या संघात वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. बाबर आझम, शादाब खान, नसीम शाह, हरिस रौफ तसेच बांगलादेशविरुद्ध वन डे सामने न खेळलेला सुफियान मोकीम यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात समावेश आहे. बाबरने नोव्हेंबर २०२५ मध्ये पाकिस्तानकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता. पीएसएलमध्ये खराब कामगिरी केलेल्या मोहम्मद रिझवानला वगळण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com