ICC latest Test bowler ranking news: पाकिस्तानचा फिरकीपटू नोमान अली ( Noman Ali) याने भारताचा सुपरस्टार जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याचं टेंशन वाढवलं आहे. ताज्या जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत नोमान अली हा नंबर १ च्या दिशेने खूप पुढे आला आहे आणि त्याने जसप्रीतच्या क्रमवारीला आव्हान दिले आहे. सध्या भारतीय गोलंदाज नंबर वन कसोटी गोलंदाज आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी बुधवारी जाहीर केली.