WCL 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला
भारतीय खेळाडूंनी वाढता रोष लक्षात घेता माघार घेतली
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीसह अनेक खेळाडू संतापले
BCCI vs PCB fresh controversy over WCL 2025: पाकिस्तानी माजी खेळाडू रोज काही ना काही कुरापती करताना दिसत आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर त्यांचा जरा जास्तच जळफळाट झालेला पाहायला मिळतोय. शाहिद आफ्रिदीच्या टीकेत सूर मिसळताना अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंनी भारताच्या भूमिकेवर टीका केली. आता तर पाकिस्तानी खेळाडूंनी नवा वाद सुरू केला आहे. IND vs PAK सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे, परंतु पाकिस्तानकडून आता त्याला विरोध होताना दिसतोय. भारताने माघार घेतली, आम्ही नाही... अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.