

Pakistan Cricket Team
Sakal
Pakistan vs Namibia, T20 World Cup 2026: टी-२० विश्वकरंडकाच्या माजी विजेत्या पाकिस्तान क्रिकेट संघावर स्पर्धेबाहेर होण्याचे संकट उभे ठाकले आहे. यजमान भारतीय संघाने यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात अ गटामधून ‘सुपर-८’ फेरीत प्रवेश केला आहे. या गटामधून पुढल्या फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असेल, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान-नामिबिया (Pakistan vs Namibia) यांच्यामध्ये आज (ता. १८) कोलंबो येथे लढत रंगणार असून, पाकिस्तानला पुढील फेरीमध्ये पोहोचण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे अन्यथा त्यांच्यावर स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकणार आहे.