T20 World Cup: 'अभिषेक शर्माला दोन सामन्यात भोपळा फोडता आला नसला तरी...', भारताचे प्रशिक्षक नेमकं काय म्हणाले?

Batting Coach Sitanshu Kotak Backs Abhishek Sharma: टी२० विश्वकरंडक २०२६ मध्ये भारताने तीन विजय मिळवून सुपर ८ फेरी गाठली आहे. पण अद्याप अभिषेक शर्माच्या बॅटमधून एकही धाव निघालेली नाही. याबाबत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सुतांशू कोटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Abhishek Sharma

Abhishek Sharma

Sakal

Updated on

Coach Kotak Confident in Abhishek Sharma's Aggressive Intent': टी२० विश्वकरंडक २०२६ स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यात विजय मिळवून सुपर ८ फेरीही गाठली आहे. या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात अभिषेक शर्मा खेळला, मात्र या दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाल्याने त्याच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सुतांशू कोटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताला पहिल्या फेरीतील अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध बुधवारी खेळायचा आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला कोटक बोलत होते.

<div class="paragraphs"><p>Abhishek Sharma</p></div>
T20 World Cup: भारताच्या मार्गातील 'मोठा' अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com