Salman Ali Agha reaction to controversial run out vs Bangladesh
esakal
Spirit of cricket debate after BAN vs PAK run out incident: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातला दुसरा सामना गाजला तो सलमान अली आघाच्या ( Salman Ali Agha Run Out) वादग्रस्त रन आऊटमुळे... मोहम्मद रिझवानसोबत शतकी भागीदारी करून पाकिस्तानचा डाव पुढे नेणाऱ्या सलमानला रन आऊट होऊन माघारी परतावे लागले. मेहिदी हसन मिराजने चतुराईने पाकिस्तानी फलंदाजाची विकेट मिळवली आणि त्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण, जेव्हा सलमान आघाला या प्रकरणावर त्याचे मत विचारले असते, तर त्याने खिलाडूवृत्तीचा पाठ वाचण्यास सुरूवात केली. मात्र, याच पाकिस्तानी संघांच्या माजी खेळाडूंनी १९९८-९९ मध्ये सचिन तेंडुलकरला असंच रडून रन आऊट केलं होतं आणि त्यानंतर मैदानावर राडाच झालेला..