
Pakistani Players Fined by ICC: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आलेल्या त्रिदेशीय वन-डे मालिकेतील अंतिम सामन्यामध्ये ICC च्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. मालिकेतील अंतिम सामना पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका या दोन देशांदम्यान खेळवण्यात आला. सामना तर पाकिस्तानने जिंकला पण सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या अतिरेकामुळे त्यांच्यावर आयसीसीकडून कारवाई करण्यात आली आहे.