Shaheen Afridi replaces Mohammad Rizwan as Pakistan’s new ODI captain amid PCB’s leadership shake-up.
esakal
Shaheen Afridi replaced Mohammad Rizwan as Pakistan ODI captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) संगीत खुर्चीचा खेळ सुरू केला आहे. मागील वर्षभरात त्यांच्या प्रशिक्षकांमध्येच नव्हे तर कर्णधारपदीही वारंवार बदल केले गेले आहेत. पण, त्यानंतरही त्यांच्या पदरी यश काही आलेले दिसत नाही. पाकिस्तानच्या वन डे संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान याची PCB हे हकालपट्टी केली असून २५ वर्षीय शाहीन शाह आफ्रिदी हा नवा कर्णधार झाला आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी सामना सुरू असताना पीसीबीने ही घोषणा केली. ३३ वर्षीय रिझवान आणि २५ वर्षीय शाहीन दोघंही या कसोटी संघाचे सदस्य आहेत.