
Pakistan's Name on Team India's New Jersey: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होत आहे आणि यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा उद्घाटनीय सामना कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० फेब्रुवारीला बांगलादेशचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरेल. सर्व संघ सध्या स्पर्धेसाठी जोमाने तयारी करत आहेत आणि दुबईमध्ये होणाऱ्या आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघही कठोर परिश्रम घेत आहे.