
Palaash Muchhal - Smriti Mandhana Relationship: भारताची स्टार महिला फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना मैदानावर विविध विक्रम करत असते, त्यामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ती म्युझिक कम्पोझर पलाश मुच्छलसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. त्यांनी अनेकदा सोशल मीडियावरही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशीपबाबत चर्चा होती.
अखेर त्यांनीच त्यांच्या नात्याला ५ वर्षे पूर्ण झाल्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि या चर्चांना पूर्णविराम दिला होता.