

Australia vs England: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने हायब्रिड पद्धतीने खेळली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे सामने दुबईत होत आहेत, तर इतर संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होत आहेत. त्यामुळे त्याबाबत अनेकांनी विविध मतं मांडली आहेत.
याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार पॅट कमिन्सचे एक विधान व्हायरल होत होते. त्यावर आता त्याने स्वत:च पुढे येत स्पष्टीकरण दिले असून ऑस्ट्रेलियन पल्बिकेशनला सुनावलं आहे.