

PCB Action
esakal
PCB Bans Hamza Nazar for Two Years: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) क्रिकेटपटू हमजा नजर याच्यावर मोठी कारवाई केली आहे. व्हिसासाठी अर्ज करताना चुकीची आणि अपुरी माहिती दिल्याचा ठपका ठेवत बोर्डाने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. एवढंच नाही, तर त्याला १० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पीसीबीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली होती. चौकशीत हमजा नजरने व्हिसा अर्ज करताना काही महत्त्वाची माहिती लपवली आणि चुकीची माहिती दिल्याचं समोर आलं. त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर समितीने त्याला दोषी ठरवलं.