इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पंजाब किंग्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये ६ धावांनी पंजाबला पराभूत करून १८ वर्षांत पहिले आयपीएल जेतेपद नावावर केले. पंजाब किंग्सचा प्रवास उपविजेतेपदावर संपुष्टात आल्यानंतर रेडिओ जॉकी महवश हिने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली. त्यात तिने युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) याच्याबद्दल लिहिले. लोकांना हे माहीत असायला हवं, असं तिने त्या पोस्टमध्ये लिहिले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.