यंदाच्या SA20 लिलावासाठी ७८४ खेळाडूंमध्ये १३ भारतीय खेळाडूंनी नाव नोंदवले आहेत.
पियुष चावला, सिद्धार्थ कौल आणि अंकित राजपूत यांसारखे आयपीएल अनुभवसंपन्न खेळाडू यामध्ये आहेत.
उर्वरित भारतीय खेळाडूंपैकी बहुतेक जण घरगुती क्रिकेट किंवा माजी आयपीएल खेळाडू आहेत.
List of 13 Indians registered for SA20 auction 2025 : भारतीय खेळाडू सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झाल्यानंतर परदेशातील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळू शकतात आणि यावर्षी जवळपास १३ खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या SA20 लीगसाठीच्या लिलावात नावं नोंदवली आहेत. ९ सप्टेंबरला होणाऱ्या लिलावात ७८४ खेळाडूंमध्ये १३ भारतीय खेळाडू आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचायझीकडून खेळणाऱ्या माजी खेळाडूंचा समावेश आहे.