Rohit Sharma criticises Indian cricket commentators भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या या अचानक निवृत्तीने अनेकांना धक्का बसला. बीसीसीआय आणि निवड समितीला नवा चेहरा कर्णधार म्हणून हवा होता आणि त्यांनी रोहितला हे स्पष्ट सांगितल्याचे वृत्त होते. रोहितने बुधवारी सायंकाळी ७:२९ वाजता सोशल मीडियावर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आज त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.