Prema Rawat has replaced injured Shreyanka Patil
esakal
BCCI announces multiple squad changes after Shreyanka Patil injury: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय महिला संघात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. फिरकीपटू श्रेयांका पाटील हिला दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. १७ जून २०२६ रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना श्रेयंकाच्या घोट्याला दुखापत झाली होती. आयसीसीच्या तांत्रिक समितीने तिच्या बदली खेळाडूला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, महिला निवड समितीने उर्वरित सामन्यांसाठी लेग स्पिनर प्रेमा रावतला भारताच्या संघात स्थान दिले आहे.