
Prithvi Shaw vs MCA: पृथ्वी शॉ याला गैरवर्तनामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने विजय हजारे ट्रॉफीच्या संघातून बाहेर बसवले. पृथ्वीचा फॉर्मही तसा फारसा चांगला राहिलेला नाही. त्यात त्याचे खेळात कमी अन् अन्य गोष्टींत जास्त लक्ष असल्याचा आरोप होतोय. तो संघाच्या सराव सत्रातही अनुपस्थित राहत होता आणि त्यामुळे अन्य खेळाडूंनाही मानसिक त्रास होत होता, असे कालच MCA च्या अधिकाऱ्यांना नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले होते. त्यातच तो रात्रभर बाहेर असायचा आणि पहाटे ६ वाजता संघाच्या हॉटेलमध्ये परतत असल्याचाही दावा केला गेला. त्यावर पृथ्वीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहून टीका केली आहे.