Karun Nair retirement advice T20 leagues : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक असलेला करुण नायर, जवळपास ८ वर्षांनी पुनरागमन करतोय. २०१७ नंतर त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले, ते त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर. इंग्लंडमध्ये त्रिशतक झळकावल्यानंतरही करुणला बाकावर बसवले गेले आणि त्यानंतर तो प्रचंड मानसिक दडपणातही गेला होता. पण, भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचे स्वप्न त्याने सोडले नव्हते.. या कालावधीत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोड, पैसा कमव.. ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळ, असा सल्ला भारताच्या एका प्रमुख खेळाडूने दिला होता. असा खुलासा करुण नायरने स्वतः एका मुलाखतीतून केला.