
Punjab beat Mumbai in Vijay Hazare Trophy : पंजाब संघाने विजय हजारे ट्रॉफीत मुंबईच्या संघावर शनिवारी दणदणीत विजय मिळवला. अर्शदीप सिंगने भेदक मारा करून मुंबईची अवस्था ५ बाद २८ अशी केली होती. पण, अथर्व अंकोलेकर, शार्दूल ठाकूर व सूर्यांश शेडगे यांच्या फटकेबाजीने मुंबईला २४८ धावांपर्यंत पोहोचवले. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने नाबाद १५० धावा केल्या आणि २९ षटकांत संघाचा ८ विकेट्स राखून विजय पक्का करून दिला.