PV Sindhu enters Japan Open 2026 final
esakal
PV Sindhu vs Chen Yufei Japan Open semifinal: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. टोकियो ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईने दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या लढतीतून माघार घेतल्याने सिंधूला पुढेचाल मिळाली. ३१ वर्षीय भारतीय खेळाडू २१-१९, १५-१० अशी आघाडीवर होती आणि तेव्हा जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चेनला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे सामना सोडावा लागला.