
Spin Legend R Ashwin Retirement : भारताचा महान अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गॅब्बा कसोटी दरम्यान विराट कोहली आणि अश्विनचा भावनिक व्हिडीओ व्हायर झाला, तेव्हाच त्याच्या निवृत्तीचा अंदाज लावला गेला होता. सामन्यानंतर त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. आर अश्विन हा भारताचा यशस्वी अष्टपैलूंपैकी एक आहे आणि त्याने कसोटीत १०६ कसोटीत ५३७ विकेट्स घेतल्या आहेत आणि शिवाय ३५०३ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये अश्विनने ११६ सामन्यांत १५६ विकेट्स व ७०७ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० त्याच्या नावावर ७२ विकेट्स आहेत आणि १८४ धावा आहेत.