R Ashwin: 'आयुष्यभर धोनीचे उपकार विसरणार नाही...', कॅप्टन कूलबद्दल बोलताना अश्विन झाला भावूक

R Ashwin on MS Dhoni: आर अश्विनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीबद्दल बोलताना माजी कर्णधार एमएस धोनीचे आभार मानले आहेत.
R Ashwin - MS Dhoni
R Ashwin - MS DhoniSakal

R Ashwin on MS Dhoni: आर अश्विन सध्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक गणला जातो. त्याने कारकिर्दीत 700 हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत. दरम्यान, त्याच्या कारकिर्दीतच्या सुरुवातीला मदत केल्याबद्दल त्याने माजी कर्णधार एमएस धोनीचे आभार मानले आहेत.

अश्विनने धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो आयपीएलमधून प्रकाशझोतातही आला होता.

तो 2008 साली देखील सीएसके संघात होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने 2009 मध्ये मात्र आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पण केले.

R Ashwin - MS Dhoni
Ravichandran Ashwin IND vs ENG : आता लोक काय म्हणतील याची भीती नाही... अश्विन 100 व्या कसोटीनंतर असं का म्हणाला?

दरम्यान 2011 आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध धोनीने अचानक अश्विनकडे नवीन चेंडू सोपवण्याचा निर्णय घेतला आणि अश्विननेही त्याचा विश्वास खरा ठरवत ख्रिस गेलला चौथ्याच चेंडूवर माघारी धाडले होते. त्यानंतर अश्विनने कारकिर्दीत मोठी भरारी घेतली.

आता त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द सुरू होऊन एका दशकापेक्षाही अधिक काळ उलटला आहे. तसेच तो दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तीतही बसला आहे.

असे असतानाच तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने त्याच्या 500 कसोटी विकेट्सच्या आणि 100 कसोटी सामन्यांचा आनंद साजरा करण्यासाठी त्याचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी अश्विनने बोलताना म्हटले की तो धोनीचा आयुष्यभर ऋणी राहिल.

R Ashwin - MS Dhoni
IPL 2024 MS Dhoni CSK : तर हे धोनीच्या निवृत्तीचं कारण ठरेल... माजी खेळाडूने धोनीबाबत दिले मोठे संकेत?

तो म्हणाला, 'मी सहसा माझ्या भावना शब्दाब व्यक्त करत नाही. पण मी खरंच इथे आहे, याबद्दल कृतज्ञ आहे.'

अश्विन पुढे म्हणाला, 'साल 2008 मध्ये मी मॅथ्यू हेडन आणि एमएस धोनी अशा अनेक दिग्गजांना भेटलो होते. मी त्यावेळी त्यांच्यासोबत बसलोही. तेव्हा माझी काहीही ओळख नव्हती, त्या संघात मुथय्या मुरलीधरनसारखा खेळाडू होता. '

'मी धोनीने मला जे काही दिले, त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहिल. त्याने मला ख्रिस गेल समोर असताना नवीन चेंडू हातात दिला होता आणि 17 वर्षांनंतर अनिल भाई (अनिल कुंबळे) त्याच घटनेबद्दल बोलले.'

याशिवाय अश्विनने तमिळनाडू क्रिकेटचेही आभार मानले, तसेच तमिळनाडू संघातील त्याचा पहिला कर्णधार एस बद्रिनाथ आणि एस शरथ यांचेही आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com