

R Ashwin shares screenshot of call list : रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास ७५० विकेट्स घेऊन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दिला रामराम करण्याचा निर्णय घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील तिसरा सामना गॅबावर खेळवला गेला आणि पाचव्या दिवशी कसोटीचा निकाल अनिर्णित जाहीर झाल्यानंतर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 'भारतीय संघासोबतचा हा माझा शेवटचा दिवस आहे,'असे सांगून अश्विन दुसऱ्याच दिवशी मायदेशात परतला.