R Ashwin's hilarious mimicry of Sanju Samson during a mock conversation
esakal
R Ashwin Trolls Selection Drama With Funny Sanju Samson Skit: संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यावरून सध्या वाद रंगला आहे... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदात सिंहाचा वाटा उचणाऱ्या संजूला निवड समिती प्रमुख अजित आगरकर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी झिम्बाब्वे दौऱ्यावरील संघातूनच बाहेर केले. त्याच्याजागी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली, पंरतु त्याला दोन्ही सामन्यांत अपयश आले. आता संजूला चौथ्या ट्वेंटी-२०त खेळवणार की नाही, याबाबत सवाल केले जात आहेत. अशात भारताचा महान फिरकीपटू आर अश्विन याने भन्नाट नकल करून आगरकर व गंभीर यांना ट्रोल केले. सध्या अश्विनचा हा Video सोशल मीडिया गाजवतोय.