Rachin Ravindra right shoulder dislocation injury
esakal
India vs New Zealand T20I 2026 Rachin Ravindra update: भारतीय संघाला आता सातत्याने क्रिकेट मालिका खेळायच्या आहेत आणि पुढील महिन्याभरात जवळपास ६९ भारतीय खेळाडू वेगवेगळ्या मालिकेत व स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. यात न्यूझीलंड दौरा खास असणार आहे, कारण रोहित शर्मा व विराट कोहली यांची क्रेझ पाहता या दौऱ्यावर पाच वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासह पाच ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका आहेच. पण, या मालिकेपूर्वी मोठा धक्का देणारी बातमी न्यूझीलंड संघासाठी आली आहे. न्यूझीलंडचा स्टार ऑल राऊंडर रचीन रवींद्र याला दुखापतीमुळे ट्वेंटी-२० मालिकेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. पण, त्याला ही दुखापत झाली कशी, हे जाणून अनेकांना हसू येतंय..