
Rachin Ravindra Injury : पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर रचिन रविंद्रला गंभीर दुखापत झाली. रविंद्रच्या तोंडाला चेंडू लागून तो लगेचच रक्तबंबाळ झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मुख्य फलंदाज अशाप्रकारे दुखापतग्रस्त झाल्यामुळे न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
५ बाद १९८ धावा अशी परिस्थिती असताना, पाकिस्तानी फलंदाज खुशदीलने ३८ व्या षटकातील दुसरा चेंडू स्केअर लेगच्या दिशेने भिरकाला. सीमारेषेवर उभ्या असेलेल्या रचिनने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण चेंडू थेट, त्याच्या तोंडावर आदळला आणि रक्तप्रवाह सुरू झाला.