
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहून सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) हिला नक्की पश्चाताप झाला असेल... आपण चांगल्या अष्टैपलू खेळाडूला आयपीएल २०२५च्या लिलावापूर्वी उगाच रिलीज केले, हे दुःख तिला नक्की सतावू लागले आहे. कारण, काल या अष्टपैलू खेळाडूने पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जी धुलाई केली, ती पाहून हा खेळाडू आपल्या संघात असायलाच हवा, असे सर्वांना वाटले असेल. या पठ्ठ्याने अवघ्या ७४ चेंडूंत शतक झळकावले आणि न्यूझीलंडसाठी शेवटच्या १० षटकांत १२० धावा उभारल्या. आता तो कोण आणि पाकिस्तानला त्याने कसे रडवले? हे वाचूया...