
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रचिन रवींद्र याला शनिवारी पाकिस्तानविरुद्ध तिरंगी मालिकेतील वनडे सामना खेळताना डोक्याला मोठी जखम झाली. लाहोरला झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान त्याच्या डोक्याला जोरात चेंडू लागला होता.
चेंडू लागल्यानंतर त्याच्या कपाळातून रक्तही वाहू लागले होते, त्यामुळे त्वरित मेडिकल स्टाफने त्याच्यावर उपचार करत त्याला मैदानातून बाहेर नेले होते. तो मैदानातून बाहेर जात असतानाही डोक्याला टॉवेल लावून जात असल्याचे दिसले होते. या घटनेबद्दल क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा झाली आहे.