Rahul Dravid: भारतीय संघाचा कोच पुन्हा होणार का? द्रविडने अखेर स्पष्टच दिलं उत्तर

Team India Coach: टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर पुन्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार की नाही, यावर राहुल द्रविडने स्पष्ट उत्तर दिले आहे.
Rahul Dravid | Team India Coach
Rahul Dravid | Team India CoachSakal

India Cricket Team Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी उमेदवारी अर्ज मागवले होते. त्यामुळे आता भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार की राहुल द्रविड कायम राहणार याची चर्चा होती. अशातच आता राहुल द्रविडने याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे.

राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून जून 2024 नंतर कार्यकाळ संपणार आहे. यानंतर त्याने पुन्हा अर्ज केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होत असलेली टी20 वर्ल्ड कप स्पर्धा प्रशिक्षक म्हणून शेवटची असल्याचे द्रविडने स्पष्ट केले आहे.

Rahul Dravid | Team India Coach
T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचा धुव्वा ; ॲनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडाची प्रभावी गोलंदाजी

या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी द्रविडने पत्रकारांशी संवाद साधला.

द्रविडने सांगितले की त्याने भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. प्रत्येक स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. भारताचा प्रशिक्षक म्हणून प्रत्येक सामना महत्त्वाचा होता. तसेच त्याने असेही म्हटले हा भारताचा प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असली, तरी त्याचा फारसा त्याच्यावर परिणाम होणार नाही.

द्रविडने 2021 च्या अखेरीस भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली होती.

Rahul Dravid | Team India Coach
T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचे पारडे जड ; टी-२० विश्‍वकरंडकात पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या युगांडाचा कस लागणार

त्याने म्हटले की 'मला माझं काम आवडतं. मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा पूर्ण आनंद घेतला. हे विशेष कामही होते. मला संघाबरोबर काम करायला मजा आली. मात्र आता क्रिकेटच्या या अशाप्रकारच्या व्यस्त वेळापत्रक आणि आयुष्याच्या या वळणावर आहे, त्यावरून मला वाटत नाहीये की मी पुन्हा अर्ज करेल.'

द्रविडच्या नेतृत्वात भारताने 2022 टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने उपांत्य फेरीत धडक मारली होती, तसेच टेस्ट चॅम्पियनशीप 2023 आणि वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धांच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com