

Sonal Dinusha Story
esakal
Sonal Dinusha Struggle Story: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेला सामना वाचवून देण्यात सोनल दिनुषाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या संयमी फलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशांना मोठा धक्का बसला. पण भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या या २५ वर्षीय खेळाडूचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. दिनुषासाठी त्याची पहिली क्रिकेट बॅटही त्याच्या बहिणीने उधार पैसे घेऊन विकत घेतली होती.
दिनुषाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे साहित्य घेणंही त्याच्यासाठी सोपं नव्हतं. मात्र, त्याची क्रिकेटची आवड आणि मेहनत पाहून बहिणीने पैसे उधार घेतले आणि त्याच्यासाठी पहिली बॅट खरेदी केली.