Mohammed Siraj and Zanai Bhosle share Raksha Bandhan moment : मोहम्मद सिराजने इंग्लंड दौरा गाजवला आणि पाच कसोटीत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या. भारताला दी ओव्हल कसोटीत त्याने अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. आता भारतीय खेळाडूंना जवळपास महिन्याभराची विश्रांती मिळाली आहे. आता भारतीय संघ थेट पुढील महिन्यात आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. अशात सिराज कुटुंबाला वेळ देतोय आणि काल त्याने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.